राज्यपाल रमेश बैस यांचा रविवारचा गडचिरोली जिल्हा दौरा रद्द

प्रशासकीय यंत्रणेची धावपळ थांबली

गडचिरोली : राज्यपाल रमेश बैस येत्या रविवार, दि.१० डिसेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार होते. सकाळी ११ वाजता त्यांच्या उपस्थितीत पोर्ला येथे विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत महिला सशक्तीकरण अभियानाचा कार्यक्रम होणार होता. परंतू शनिवारी संध्याकाळी तो दौरा रद्द झाला.

राजभवनाकडून संध्याकाळी उशिरा नियोजित दौरा रद्द झाल्याचे कळविण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापाठोपाठ राज्यपालांचाही दौरा रद्द होण्यामागे नेमके कोणते कारण आहे, अशी कुजबूज नागरिकांमध्ये सुरू आहे.