शासकीय सेवेसह राजकीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्यांचा सत्कार

मानवाधिकार संघटनेच्या वतीने आयोजन

गडचिरोली : राष्ट्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या, तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार सोहळा रविवार दि.10 ला दुपारी 12 वाजता गडचिरोलीच्या पोटोगाव मार्गावरील गोंडवाना कलादालनात आयोजित केला आहे.

ना.धर्मरावबाबा आत्राम, खा.अशोक नेते आणि इतर लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित राहतील. यावेळी ज्येष्ठ नाट्यकलावंत पद्मश्री परशुराम खुणे यांच्यासह जिल्ह्यातील 150 व्यक्तींचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन सत्कार केल्या जाणार आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल आणि प्रदेश अध्यक्ष प्रणय खुणे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ता ज्ञानेद्र बिस्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, विदर्भ महिला अध्यक्ष पायल कापसे, विदर्भ सचिव अनिल गुरनुले, विदर्भ संघटन प्रमुख राम लांजेवार, जिल्हाध्यक्ष, तालुका अध्यक्ष व पदाधिकारी हे या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत.