ओबीसी युवकांच्या उपोषणाची सांगता; ना.धर्मरावबाबा यांनी दिले लिंबूपाणी

मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन

गडचिरोली : ओबीसी समाजातील विविध मागण्यांसाठी समाज संघटनेतील युवक 4 मार्चपासून साखळी उपोषणावर होते. दि.8 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी उपोषणकर्त्यांना लिंबूपाणी देऊन उपोषणाची सांगता केली. मुख्यमंत्री व ओबीसी कल्याणमंत्री यांच्याशी सोमवारी चर्चा करून मागण्या सोडविण्याचा प्रयत्न करणार, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी ओबीसी समाज युवा संघटनेच्या वतीने साखळी उपोषण मागे घेण्यात आले, मात्र मागण्या पूर्ण न झाल्यास यापुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही उपोषणकर्त्यांनी दिला. यावेळी सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, तसेच उपोषणकर्ते राहुल भांडेकर, अनुप कोहळे, पंकज खोबे, पदंम भुरसे, संतोषी सुत्रपवार, अजय सोमनकर, नयन कुनघाडकर, महेंद्र लटारे यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष शेषराव येलेकर, जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, सुरेश भांडेकर, मंगला कारेकर, नम्रता कुत्तरमारे यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी युवा पदाधिकारी उपस्थित होते.