अवैध दारू विक्री करणा­ऱ्या आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला

गडचिरोली : येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश आर.आर. खामतकर यांनी मुरखळा येथील एका दारू विक्रेत्याला तीन वर्षे सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. स्वामी नरसय्या गणवेनवार असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, 1 जून 2021 रोजी तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा व त्यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत मुरखळा भागातील स्वामी नरसय्या गणवेनवार याच्या घरातून विदेशी दारुच्या निपा आढळून आल्याने त्याच्याविरुध्द कलम 65 (इ) म.दा.का. अन्वये नोंद करुन तपास करण्यात आला. हवालदार रमेश उसेंडी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून आरोपीविरुध्द सबळ पुरावे गोळा करून दोषारोप पत्र दाखल केले. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन दि.12 रोजी आरोपी स्वामी नरसय्या गणवेनवार (53 वर्ष) याला शिक्षा सुनावली.सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील बी.के. खोब्राागडे यांनी कामकाज केले.