१० चाकी ट्रक भरून येत असलेली १० लाखांची देशी दारू पकडली

जिमलगट्टा पोलिसांनी धडक कारवाई

गडचिरोली : एकीकडे गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या १० चाकी ट्रकमध्ये भरून येणारी देशी दारु पकडण्यात पोलिसांना यश आले. आलापल्ली ते सिरोंचा मार्गावर जिमलगट्टा पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली.

सदर अवैध दारू वाहतुकीची गोपनिय माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, जिमलगट्टाचे प्रभारी अधिकारी सपोनि संगमेश्र्वर बिराजदार व पोलीस स्टाफ यांनी सापळा सदर ट्रक पकडला. यावेळी आरोपी कैलास मडावी रा.लखनगुड्डा याला पकडून त्याच्या ताब्यातून अशोक लेलँड कंपनीचा १० चाकी ट्रक(एम.एच.40 सी.डी. 3530) आणि त्यात भरलेली १० लाख रुपयांची रॉकेट कंपनीची संत्रा देशी दारु असा एकूण 25 लाखांचा एेवज जप्त केला.

सदर आरोपीवर जिमलगट्टा उपपोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि बिराजदार करत आहेत.

जिल्ह्यात कुठेही अशा पद्धतीने होत असलेल्या अवैध दारु अथवा तत्सम अंमली पदार्थाच्या वाहतुकीबद्दल माहिती मिळताच गडचिरोली पोलिस दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले आहे.