गडचिरोली जिल्ह्यात येण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन तहसीलदारांचे निलंबन

अडीच महिने झाले तरी रूजू झालेच नाही

गडचिरोली : राज्याच्या पूर्व टोकावरील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात बदली झाल्यानंतर रूजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन तहसीलदारांना महसूल विभागाने निलंबित केले. विहीत मुदतीत रूजू न झाल्याने महसूल आणि वनविभागाचे अवर सचिव संजीव राणे यांनी तिघांच्याही निलंबनाचे आदेश जारी केले.

अडीच महिन्यांपूर्वी, म्हणजे ३० जून रोजी राज्य सरकारच्या सेवेतील तहसीलदार बी.जे.गोरे यांची एटापल्ली, सुरेंद्र दांडेकर यांची धानोरा तर विनायक धविल यांची देसाईगंज येथे बदली झाली होती. परंतू हे तीनही अधिकारी त्या ठिकाणी रुजू झाले नाही.