उद्योगविरहित गडचिरोली जिल्हा खरंच औद्योगिक जिल्हा म्हणून विकसित होणार?

ऐका उद्योगमंत्र्यांनी काय स्वप्न दाखविले

गडचिरोली : मोठ्या प्रमाणात असलेली खनिज संपत्ती, वनसंपत्ती आणि त्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात मिळणारा तेंदूपत्ता, मोहफूल, बांबूसारखा कच्चा माल, भरपूर प्रमाणात पिकणारा तांदूळ अशा औद्योगिक विकासासाठी पुरक असणाऱ्या भरपूर गोष्टी गडचिरोली जिल्ह्यात आहेत. तरीही या जिल्ह्यात आतापर्यंत कोणताही मोठा उद्योग सुरू झाला नाही. आता हे चित्र बदलेल. नुसतेच बदलणार नाही, तर गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील पहिल्या पाच औद्योगिक जिल्ह्यांमध्ये गणला जाईल, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकताच केला. पण हे खरंच शक्य आहे का, अशी शंका घेतली जात आहे.