कोत्ताकोंडा येथे एकाच मैदानात कबड्डी व व्हॅालीबॉल स्पर्धेचे आयोजन

भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते उद्घाटन

एटापल्ली : तालुक्यातील कोत्ताकोंडा (बु) येथे कोंडागड क्लबतर्फे ग्रामीण कबड्डी व व्हॅालीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एकाच मैदानात आयोजित या दोन्ही स्पर्धांचे उद्घाटन माजी जि.प.अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी सहउद्घाटक म्हणून गाव पाटील लक्ष्मण इष्टाम, स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून गंगाराम इष्टाम, उपाध्यक्ष लालूजी उसेंडी, राकाँचे एटापल्ली तालुका अध्यक्ष श्रीकांत कोकुलवार, माजी जि.प.सदस्य ज्ञानकुमारी कौशी, विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, सरपंच साधू कोरामी, भूमिया लालसू इष्टाम, घोटसुरचे माजी सरपंच शिवाजी हेडो, हालेवाराचे माजी सरपंच गणुजी मट्टामी, नगरसेवक जितेंद्र टिकले, जारावंडीच्या सरपंच सपना कोडापे, येमलीच्या सरपंच ललिता मडावी, नगरसेविका निर्मला हिचामी, सरिता हिचामी, माजी नगरसेविका सगुणा हिचामी, चिंता गोटा, रामचंद्र चौधरी, हरिदास मोहूर्ले आदी उपस्थित होते.

कोत्ताकोंडा (बु) गावात पहिल्यांदाच अशा पद्धतीच्या कबड्डी व व्हॅलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पारितोषिक आणि आकर्षक शिल्ड ठेवण्यात आले. गावात पहिल्यांदाच क्रीडा स्पर्धेचे आयोजन झाल्याने परिसरातील विविध गावातील चमुंनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे.

या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी भाग्यश्री आत्राम यांचे गावात आगमन होताच गावकऱ्यांनी ढोलताश्यांच्या गजरात आणि विद्यार्थ्यांनी लेझिमद्वारे मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी परिसरातील कबड्डी व व्हॅालीबॉलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.