आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनद्वारा श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

भागवताच्या माध्यमातून संस्कारांची निर्मिती- खा.नेते

चामोर्शी : येथे सात दिवसीय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन मंदिर चामोर्शीद्वारा करण्यात आले आहे. या भागवत कथा सप्ताहाचा शुभारंभ दीपप्रज्वलन व विधीवत पुजन करून खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आला.

याा कार्यक्रमाप्रसंगी खासदार नेते यांनी भाविकांना मार्गदर्शन करताना आजच्या काळात गुंडागर्दी, भ्रष्टाचार, युवकांमधील व्यसनाधीनता यावर मात करायची असेल तर अशा श्रीमद् भागवत कथा, धार्मिक, अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करणे काळाची गरज आहे. या माध्यमातून संस्कार रूजविले जातात. याबरोबरच थोर महापुरुषांचे विचारसुद्धा अंगीकारले पाहिजे. अशा आध्यात्मिक कार्यातून आचार, विचार व संस्कारांची जडणघडण होत असल्याचे ते म्हणाले.

याप्रसंगी प्रामुख्याने लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे, सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, शहराध्यक्ष सोपान नैताम, इस्कॉनचे अध्यक्ष परमेश्वर दास, तसेच मोठया संख्येने भगवान भक्तगण, महिला भगिनी, युवक वर्ग, बालगोपाल उपस्थित होते.