कुणबी महामोर्चाच्या वातावरण निर्मितीसाठी गडचिरोलीत निघाली बाईक रॅली

पुरूषांसह महिलांचाही सहभाग, पहा व्हिडीओ

गडचिरोली : राज्यात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध दर्शविण्यासाठी येत्या ५ आॅक्टोबरला गडचिरोलीत कुणबी महामोर्चा काढल्या जाणार आहे. त्या महामोर्चाची वातावरण निर्मिती करण्यासाठी रविवारी बाईक रॅली काढण्यात आली.

शिवाजी महाविद्यालयातून निघालेली ही बाईक रॅली बायपास मार्ग, नवेगाव, कारगिल चौक, तेली मोहल्ला, आरमोरी रोड, इंदिरा गांधी चौक मार्गे पुन्हा शिवाजी महाविद्यालयात समाप्त झाली. यात मोठ्या संख्येने भगवे झेंडे हाती घेत आणि विविध फलक दाखवत कुणबी समाजबांधव सहभागी झाले होते. विशेष म्हणजे पुरूषवर्गासोबत महिलावर्गही या रॅलीत उत्साहाने सहभागी झाला होता.