लॅायड्स इन्फिनिट फाऊंडेशनने साजरा केला जागतिक स्वच्छता दिवस

सुरजागड परिसरातील गावांमध्ये केली स्वच्छता

एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाण परिसरातील अनेक गावांमध्ये लॅायड्स इन्फिनिट फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी (दि.१६) जागतिक स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह गावातील नागरिक या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्व सांगण्यात आले. परिसरातील वातावरण आल्हाददायक आणि निरोगी ठेवण्यासाठी आमच्या गावात नेहमी स्वच्छता ठेवू असा संकल्प यावेळी गावकऱ्यांनी केला.