गडचिरोली : रुग्णांना आवश्यक असलेल्या रक्ताची गरज भागवण्यासाठी सामाजिक जाणिवेतून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने पुढाकार घेत मासिक रक्तदान शिबिर सुरू केले आहे. याअंतर्गत दि.२० एप्रिल रोजी हेडरी येथील काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये झालेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विशेष म्हणजे इतरांना रक्तदानाची प्रेरणा मिळावी यासाठी लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरण यांनी स्वतः रक्तदान केले. यानंतर लॉयड्सच्या 34 अधिकाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले योगदान दिले.
लॉयड्सच्या या रक्तदानाच्या मासिक उपक्रमामुळे दर महिन्याला किमान 50 युनिट रक्ताची उपलब्धता होत आहे. कंपनीचा हा उपक्रम परिसरातील नागरिकांसाठी नवजीवन देणारा ठरला आहे.