गडचिरोलीत सुश्री अल्काश्री यांच्या संगीतमय सुंदरकाण्ड भागवत कथेला सुरूवात

खा.अशोक नेते यांच्या हस्ते पुजन

गडचिरोली : निवडणुकीची धामधूम आटोपताच गडचिरोली शहरात हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर ज्येष्ठ भागवत कथावाचक सुश्री अलकाश्री यांच्या संगीतमय सुंदरकाण्ड श्रीराम भागवत कथेचे आयोजन हनुमान लॅान, पोटेगाव बायपास रोड, गडचिरोली येथे करण्यात आले आहे. रविवार, दि.21 एप्रिलला खासदार अशोक नेते यांनी या कथा सप्ताहाला उपस्थित राहून पुजन करत सप्ताहाची सुरूवात केली.

याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना खा.नेते म्हणाले, भागवत कथेतून आचार-विचार आणि संस्कारांची निर्मिती होते. समाजातील नकारात्मक प्रवृत्ती, हिंसाचार, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता याला आळा घालून सकारात्मक उर्जा निर्मितीसाठी श्रीराम भागवत कथा उपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या संगीतमय श्रीराम कथा सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी आ.डॅा.देवराव होळी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, कार्यक्रमाचे आयोजक रमेश सारडा व शेषनारायण जुगलकिशोर काबरा, तसेच समस्त काबरा व सारडा परिवारासह मोठया संख्येने भाविक उपस्थित होते.