लॅायड्स मेटल्सच्या वतीने सुरजागड खाणीत देण्यात आले सुरक्षेचे धडे

२२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग

गडचिरोली : लॅायड्स मेटल्स अॅन्ड एनर्जी लिमिटेडच्या वतीने सुरजागड खाणीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी व्यवहार आधारित सुरक्षेचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. दि.३० आणि ३१ आॅक्टोबरला दोन दिवस आयोजित या प्रशिक्षणात खाणीतील २२५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या शिबिराला कंपनीचे कार्यकारी संचालक आर.सत्पती, महाव्यवस्थापक जीवन हेडाऊ, सुरक्षा अधिकारी मोहसिन खान, महाव्यवस्थापक गणेश सेठी आणि इतर अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

व्यवहार आधारित सुरक्षा प्रशिक्षणासाठी जगभरात प्रसिद्ध असलेले या प्रकारच्या प्रशिक्षणाचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या हरबंसलाल कैला यांच्या वतीने हे प्रशिक्षण देण्यात आले. जोखमीच्या ठिकाणी काम करताना व्यवहार आधारित संरक्षण हे एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते. आयएसओ 45001 द्वारा प्रमाणित या शिबिरातील सर्व सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वाटण्यात आले. सुरजागड खाणीतील सुरक्षा विभागाच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन केले होते.