कामगार दिनानिमित्त वॅाल पेंटिंग युनियनने राबविला भोजनदानाचा उपक्रम

जिल्ह्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिन साजरा

गडचिरोली : 1 मे रोजी महाराष्ट्र दिनासोबत कामगार दिनही साजरा केला जातो. त्यानिमित्त गडचिरोलीत वॅाल पेंटिंग युनियनच्या वतीने कामगारांच्या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करून नंतर भोजनदानाचा उपक्रम राबविला. याशिवाय विविध ठिकाणी महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.

चामोर्शी मार्गावरील भाग्यलक्षमी इंटरप्राईजेस पेन्ट येथे, गडचिरोली वॉल पेंटिंग युनियनकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण शेंडे, उपाध्यक्ष प्रवीण दसरवार, सचिव सुधाकर मुनघाटे, तसेच प्रशांत चुधरी, दिवाकर उंदीरवाडे, मनोज जेंगटे, विकास गेडाम आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष करून भाग्यलक्ष्मी इंटरप्रायजेसचे संचालक विजय वाघुलकर यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

विद्यापीठात कुलगुरूंच्या हस्ते ध्वजारोहण

गोंडवाना विद्यापीठ परिसरात कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी डॉ.बोकारे यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्राच्या प्रगतीबाबत सांगितले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ.श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल हिरेखन, अधिष्ठाता डॉ.अनिल चिताडे, अधिष्ठाता डॉ.ए.एस.चंद्रमौली, वित्त व लेखा अधिकारी भास्कर पठारे, तसेच विद्यापीठातील सर्व संविधानिक अधिकारी, शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

आरमोरी तहसील कार्यालयात आ.गजबे यांच्या हस्ते ध्वजारोहण

आरमोरी तहसील कार्यालयात आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करीत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा सचिव नंदू पेट्टेवार, तालुका अध्यक्ष पंकज खरवडे, न.प. आरोग्य सभापती भारत बावनथडे, तहसीलदार श्रीहरी माने, पोलिस निरीक्षक रहांगडाले, नायब तहसीलदार ललितकुमार लाडे, यु.पी.राऊत, एच.ऐन.दोनाडकर यांच्यासह तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

कारवाफा आश्रमशाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे महाराष्ट्र दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मुख्याध्यापक विष्णू चव्हाण यांच्या हस्ते झाले. ध्वजसंचलन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. मानवंदना क्रीडा शिक्षक अभय कांबळे यांनी दिली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य गजानन वड्डे, शिक्षक एम.ई.ठाकूर, टी.ए.आस्कर, पद्मावती महेशगौरी, सी.डी.नळे, व्ही.एस.देसू, वर्षा मस्के, व्ही.एम.नैताम, रविकांत पिपरे, आय.एम.कुमरे, कविता बारसागडे, अधीक्षक जी.एस.सानप, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, करिश्मा गोवर्धन, सुनिता दुर्कीवार, संगीता करंगामी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, नागरिक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. ध्वजारोहण कार्यक्रमानंतर इयत्ता 1 ते 9 तसेच 11 वीच्या वार्षिक परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला.