खासदार अशोक नेते यांनी केले धानोरकर कुटुंबियांचे सांत्वन

गडचिरोली : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनाने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या धानोरकर कुटुंबाचे खासदार अशोक नेते यांनी बुधवारी सांत्वन करत त्यांच्या दुःखात सहभागी असल्याचे सांगत कुटुंबियांना धीर दिला. खा.नेते यांनी वरोरा येथील धानोरकर यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर, तसेच मुलगा मानस व पार्थ यांची भेट घेतली.

एक उमंदे, युवा, धडाडीचे नेतृत्व हरपले, माझे संसदेतील सहकारी आज अनंतात विलीन झाले ही बाब मनाला दुःख देणारी असल्याची भावना व्यक्त करत त्यांच्या आत्म्यास चिरशांती मिळो, अशी प्रार्थना यावेळी खासदार अशोक नेते यांनी केली.यावेळी ओबीसी मोर्चाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा भाजपाचे सावली तालुकाध्यक्ष अविनाश पाल, माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अहिरकर उपस्थित होते.