पोटगाव येथील धान खरेदी केंद्राचा आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते शुभारंभ

ऑनलाइन नोंदणी करा, हमीभावाचा लाभ घ्या

देसाईगंज : आदिवासी विकास महामंडळांतर्गत येत असलेल्या देसाईगंज तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सोसायटी पिंपळगावच्या पोटगाव येथील धान खरेदी केंद्रावर धान खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सरपंच विजय दडमल, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी राऊत, अरुण राऊत, जितेंद्र कुकुडकार, विलास गावतुरे व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कर्मचारी, तसेच शेतकरी वर्ग व गावकरी उपस्थित होते. या केंद्रावर शासनाच्या हमीभावानुसार शेतकऱ्यांकडील धानाची खरेदी केली जाणार आहे.

विशेष म्हणजे अनेक शेतकरी अजूनही ऑनलाइन नोंदणीपासून वंचित आहेत. त्यामुळे नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून खरेदी केंद्रावर धान विकावा आणि हमीभावाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आ.कृष्णा गजबे यांनी केले आहे.