व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्यांना भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते बक्षीस वितरण

अंतिम सामन्यात कोणी मारली बाजी?

अहेरी : तालुक्यातील दिनाचेरपल्ली येथे आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेतील विजेत्या संघाला माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. दिनाचेरपल्ली येथील जयसेवा क्लबतर्फे या व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या ठिकाणी आंबटपल्ली आणि चेरपल्ली या दोन संघात अंतिम सामना रंगला. यात आंबटपल्ली संघाने विजय मिळवत प्रथम पारितोषिक पटकाविले. चेरपल्ली संघाने द्वितीय, तर धनुर संघाला तृतीय पारितोषिक मिळाले.

तिन्ही संघांना भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रथम पारितोषिक भाग्यश्री आत्राम यांच्याकडून 25 हजार, द्वितीय पारितोषिक रेणुका आत्राम यांच्याकडून 15 हजार, तर तृतीय पारितोषिक नागेश करमे यांच्याकडून 10 हजार रुपये देण्यात आले. यावेळी सरपंच रेणुका आत्राम, रतन दुर्गे, नागेश करमे, नागेश मडावी आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.