आता १५ मे पर्यंत करा धान खरेदीसाठी आॅनलाईन नोंदणी

रबी हंगामातील खरेदीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना रबी हंगाम २०२२-२३ करिता आॅनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आता १५ मे २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासनाच्या २० मार्च २०२३ च्या पत्रानुसार रबी पणन हंगाम २०२२-२३ मध्ये किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीकरीता ३० एप्रिल २०२३ अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र शासनाने २ मे २०२३ रोजी काढलेल्या पत्रानुसार, त्यासाठी १५ मे २०२३ अखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांनी विहित मुदतीत ऑनलाईन पोर्टलवर नोंद करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी दर्शन निकाळजे यांनी केले आहे.