अवकाळीने हिरावले छत, शासकीय मदत मिळेल का?

आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेडमाके आले मदतीसाठी धाऊन

देसाईगंज : सतत तीन दिवसांचा अवकाळी पाऊस आणि वादळाने देसाईगंजच्या हनुमान वाॅर्डातील नागरिकांची दाणादाण उडाली. अनेकांच्या घरांचे नुकसान झाले. तीन घरांचे छत तर पूर्णपणे उडून त्यांचा निवारा निसर्गाने हिरावला. अशा नैसर्गिक आपत्तीत या नागरिकांच्या मदतीसाठी कोणीही धावून आले नाही. पण आदिवासी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके यांनी गुरूवारी त्या भागाची पाहणी करत निवारा हिरावलेल्या त्या तीन घरांवर छत उभारण्यासाठी मदतीचा हात पुढे केला.