लोककलावंतांच्या चमुने ११ तालुक्यात केली अमृत कलश यात्रेतून जनजागृती

लुप्त होत चाललेल्या कलांचे प्रदर्शन

गडचिरोली : देशभरात राबविण्यात आलेल्या ‘मेरी माटी, मेरा देश’ आणि ‘अमृत कलश यात्रा’ या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील लोक कलावंतांच्या चमुने जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये जाऊन जनजागृती केली. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र नागपूर आणि केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने स्थानिक लोककलावंतांच्या चमुने समाजप्रबोधन केले.

यावेळी महाराष्ट्रातील लोककला लावणी, कोळी नृत्य , देशभक्तीपर गीत आणि रेला आदिवासी नृत्य सादर करून महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या या लोककलांचे प्रदर्शन करून लोकांची पारंपरिक लोककलेशी नाळ जोडली. सोबतच अभियानाबद्दल जणमाणसामध्ये प्रबोधन करून राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रबळ केली.

या अभियानात गडचिरोलीमधील लोककलावंत वैशाली कांबळे, मालनसूत अरुण, पुरुषोत्तम बुरडे, मनोज बुरडे, दीपक लाहोरी, कल्याणी शेडमाके, सोमप्रभू तांदुळकर, वंदीश नगराळे, महेश वाढई, उद्देश्य कामिडवार, रोहित लट्टेलवार, स्नेहा कौशिक, प्रणित भारती, नंदिनी बोरडावार, अनुप बोलिवार, आदित्य मराठे, अनुराग लतेलवार, सोनाली बोरकुटे, ध्रुव शेडमाके, दिव्या भोयर, गितिका खरवड़े, चेतना कोहचाड़े, अशोक नगराळे , बेबीलता खांडेकर, खोमेश बोबाटे, रुपेश चौधरी, सौरभ गेडाम, कृष्णाली पोटावी, कीर्ति जिगरवार, निखिल शेंडे यांनी सहभाग घेतल्याचे नालंदा लोककला मंच बहुउद्देशिय संस्थेचे सचिव सुशिल खांडेकर यांनी सांगितले.