आल्लापल्लीच्या आय्यप्पा स्वामी मंदिरात महापडीपुजा व अग्निगुंडम कार्यक्रम

अम्ब्रिशराव आत्राम यांचा केला सत्कार

अहेरी : दरवर्षीप्रमाणे यंदाही आलापल्ली येथे आय्यप्पा स्वामी मंदिरात महापडीपुजा तथा अग्निगुंडम कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. त्यानिमित्ताने माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी आयप्पा स्वामी पुजेला उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी त्यांचा मंदिराच्या पुजाऱ्यांकडून शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

अम्ब्रिशराव यांनी आयप्पा स्वामी मंदिरात जाऊन स्वामीला साकडे घातले. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सुख, शांती व उत्तम आरोग्य लाभावे, अशी प्रार्थना त्यांनी केली. यावेळी भाजपचे पदाधिकारी व आयप्पा स्वामींचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.