लॅायड्स मेटल्सच्या सुरजागड लोहखाणीत हेडरीतील वयोवृद्धाच्या हस्ते ध्वजारोहण

अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी खेळांचे आयोजन

एटापल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन समारंभ लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सुरजागड लोहखाणीत (आयरन ओर माईन्स) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पहाडावरील मैदानावर हेडरी येथील 90 वर्षीय पांडू कोत्तू तेलामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आहे. त्यांचा संचालकांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी लॉयड्स कंपनीकडून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. यात विजेता संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी लॉयड्स मेटल्स कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपार मेहनतीतून तयार झालेले भारताचे संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले आणि 26 जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी अशोक चक्रांकित तिरंगा ध्वज फडकावून संपूर्ण प्रजासत्ताकाची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. गेल्या 75 वर्षांपासून हा प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. गडचिरोलीच्या दुर्गम भागातही हा दिवस उत्सव रूपात साजरा केला जात असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहायला मिळाले.