नवमतदार मेळाव्यात भाजयुमो पदाधिकाऱ्यांसह युवा मतदारांशी खासदारांचा संवाद

पंतप्रधान मोदींचे आॅनलाईन मार्गदर्शन

गडचिरोली : येथील चामोर्शी मार्गावरील शासकिय विज्ञान महाविद्यालयात (सायन्स कॉलेज) नवमतदारांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना आॅनलाईन मार्गदर्शन केले. याशिवाय भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री खा.अशोक नेते यांनीही युवा मतदारांशी संवाद साधत केंद्र सरकारच्या वाटचालीची आणि युवा वर्गासाठी केल्या जात असलेल्या कामांची व योजनांची माहिती दिली.

येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवमतदारांमध्ये जागृती येण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सुरू होण्याआधी उपस्थित नवमतदारांना नमो अॅपवर लॉग-इन करून घेण्यास सांगितले होते.

यावेळी प्रामुख्याने भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, डॉ.मिलिंद नरोटे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके, सतीश चिचघरे, आशिष कोडाप, मधुकर भांडेकर, मंगेश रणदिवे, हर्षल गेडाम, दीपक सातपुते, हरिश माकडे तसेच मोठ्या संख्येने भाजपचे युवा पदाधिकारी व नवमतदार, विद्यार्थी उपस्थित होते.