महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण खंडपिठाच्या अध्यक्षपदी प्रमोद तरारे यांची नियुक्ती

गडचिरोलीच्या सुपूत्राला आणखी एक बहुमान

गडचिरोली : मूळचे गडचिरोलीकर आणि येथूनच आपल्या करिअरची सुरूवात करून अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी प्रमोद तरारे यांची आता महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाच्या खंडपिठावर अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून ही नियुक्ती करण्यात आली.

सेवानिवृत्तीनंतर काही दिवसातच तरारे यांची गेल्यावर्षी महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणावर न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आता महाराष्ट्र शासन आणि उच्च न्यायालयाशी विचारविनिमय करून त्यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील दोन वर्षासाठी त्यांची ही नियुक्ती राहणार आहे.

यापूर्वी तरारे यांनी विविध ठिकाणी न्यायाधिश म्हणून, तसेच राज्याचे धर्मदाय आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.