राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी प्रणय खुणे

जनतेवरील अन्यायाविरूद्ध आवाज उठविणार

गडचिरोली : राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या प्रदेश कार्यकारी अध्यक्षपदी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा कंत्राटदार प्रणय खुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष महेश पटेल यांनी ही नियुक्ती केली आहे. राज्यात सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण काम करू, अशी भावना प्रणय खुणे यांनी व्यक्त केली.

अनेक सरकारी कार्यालयात कामानिमिताने येणाऱ्या नागरिकांना सारख्या चकरा माराव्या लागतात. पण भ्रष्ट आणि कामचुकार प्रवृत्तीमुळे नागरिकांची कामे होत नाही. याची दखल राष्ट्रीय मानवाधिकार संघटना घेणार असून संबंधित नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे खुणे यांनी सांगितले.

त्यांच्या या नियुक्तीचे प्रदेश सचिव ज्ञानेंद्र बिस्वास, विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा अध्यक्ष किशोर शंभरकर व इतर पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले.