आलापल्ली आणि सिरोंचा येथे होणार एस.एस. सिक्युरिटी गार्ड भरती मेळावा

अहेरी क्षेत्रातील बेरोजगारांना संधी

अहेरी : औद्योगिक विकासाअभावी रोजगाराच्या संधी मर्यादित असलेल्या अहेरी विधानसभा क्षेत्रातील आलापल्ली आणि सिरोंचा येथे सिक्युरिटी गार्ड भरती मेळावा होणार आहे. माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या विशेष प्रयत्नातून बेरोजगार युवकांसाठी या मेळाव्याचे आयोजन एस.एस.सिक्युरिटी गार्ड एजन्सीच्या वतीने केले जाणार आहे.

दिनांक 15 ते 20 डिसेंबर 2023 पर्यंत आलापल्ली येथे एस.एस. सिक्युरिटी गार्ड भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यानंतर दिनांक 21 व 22 डिसेंबर 2023 पर्यंत सिरोंचा येथे एस.एस. सिक्युरिटी गार्ड भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. जास्तीत जास्त युवकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर यांनी केले आहे. अधिक माहीतीकरीता भरती अधिकारी गोरख जगताप 9284125100, स्वप्निल श्रीरामवार 8806516351, अमोल सर 7020700546, सुमीत मोटकुरवार 8055505959, अमोल मुक्कावार 9370048512 यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन भाग्यश्री आत्राम यांनी केले आहे.