गडचिरोली : वाचन संस्कृतीचा विकास सर्वत्र करायला पाहिजे. गावातील युवकांनी स्वयंप्रेरणेने गावात सार्वजनिक वाचनालय सुरु केले, याचा खरोखरच अभिमान वाटतो. यातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचा छंद निर्माण होईल. गावात निर्माण झालेले वाचनालय हे नुसते वाचनालय नसून गावाच्या प्रगतीची उजाडलेली पहाट आहे, अशी भावना प्रदेश काँग्रेसच्या डॅाक्टर सेलचे सरचिटणीस डॅा.प्रमोद साळवे यांनी व्यक्त केली.
चातगाव येथे विद्यार्थी व तरुणांनी स्वयंप्रेरणेने ‘विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतील सार्वजनिक वाचनालय’ निर्माण केले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते अध्यक्षीय मार्गदर्शन करीत होते. वाचनालयाचे उद्घाटन धानोराचे गटविकास अधिकारी टीचकुले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नर्सिंग कॅालेज चातगावचे संचालक डॅा.प्रमोद साळवे होते. प्रमुख अतिथी गटशिक्षणाधिकारी अरवेली, माजी जि.प.सदस्य राजू जीवाणी, प्रभारी पोलिस अधिकारी संतोष पाटील, चातगावचे पोलिस उपनिरीक्षक चौधरी, प्राचार्य विद्या मामीडपल्लीवार, स्वप्नील मडावी, माजी पोलिस उपनिरीक्षक शामराव उईके, डब्लू.एस. तडसे, राजू शेणमारे, गोविंद मडावी, राणी तोडासे, साहिल शेख, ग्रामपंचायत सदस्य राजू ठाकरे, ग्रामसेवक रणजीत राठोड, हेमंत कोडाप, नितीन कोत्तावार आदी उपस्थित होते.
गावातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात जातात. पण गरीब विध्यार्थ्यांना तेथील खर्च झेपत नाही. म्हणून गावातील युवक व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांनी गावातच स्वयंप्रेरणेने स्पर्धा परीक्षा व विध्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून लोकसहभागातून सार्वजनिक वाचनालय निर्माण केले. या अभिनव उपक्रमाला प्रतिसाद देत पुस्तकेही भेट दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल अलाम यांनी केले. संचालन मनोज निंबार्ते यांनी, तर आभार आदित्य नंदेश्वर यांनी मानले. कार्यक्रमासाठी कोमल कुमरे, रोशन जराते, आदित्य नंदेश्वर, सौरभ लांजेवार , शुभम मडावी, देवानंद भुसारी, हितेश जराते, भूषण लक्षणे, हर्षल टिंगुसले, अमित कलेश्वरवार, विठ्ठल अलाम, रामेश्वर वलके, रुपेश मडावी, लवकेश अलाम, अर्पिता ठाकरे, चांदनी चापले, मोनी कुळमेथे, पियुष नंदेश्वर, मोहित गंडाटे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने गावकरी, विद्यार्थी उपस्थित होते.