प्रशांत सावकार पोरेड्डीवार यांना मातृशोक, मूळ गावी अंत्यसंस्कार

माजी सरपंच श्यामराव सावकारांच्या पत्नी

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा सहकारी मुद्रणालयाचे अध्यक्ष तथा विदर्भ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक असोसिएशन नागपूरचे संचालक प्रशांत सावकार पोरेड्डीवार यांच्या मातोश्री शालिनीताई यांचे वृद्धापकाळाने नागपूर येथे निधन झाले. त्या 85 वर्षाच्या होत्या. गडचिरोलीचे माजी सरपंच शामराव सावकार पोरेड्डीवार यांच्या त्या पत्नी, तर ज्येष्ठ सहकार नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या त्या काकू होत. बुधवारी सकाळी 11 वाजता सावली तालुक्यातील अंतरगाव या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.