जिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाचा शुभारंभ

गडचिरोली : जनसामान्यांच्या कल्याणासाठी राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्य करणारे गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते आणि सामान्य माणसाशी नाळ जोडून समाजकार्यात अग्रेसर असलेले विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ.रामदास आंबटकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालयात विविध कार्यक्रम आयोजित केले होते. याअंतर्गत राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन अभियानाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सिकलसेल अभियानाचे दुरचित्रफिती शुभारंभ करण्यात आला.

यावेळी भाजप प्रदेश चिटणीस रेखा डोळस, माजी समाजकल्याण सभापती रणजिता कोडापे, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, पल्लवी बारापात्रे, रेखा ढवळे, भूमी भरडे, वैष्णवी नैताम, लता लाटकर, कोमल बारसागडे, शिल्पा भोयर, भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सोळंके, वैद्यकीय अधिकारी डॉ. बागराज धुर्वे व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.