नंदीगावच्या शाळेत नवागताचे अजय कंकडालवार यांच्या उपस्थितीत स्वागत

अहेरी : तालुक्यातील नंदीगाव येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे युवा नेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, उपसरपंच हरीश गावडे, संदीप दुर्गे, नरेंद्र गर्गम, अंगणवाडी सेविका पांडे, अंगणवाडी मदतनिस लक्ष्मण आत्राम, राकेश सडमेक, चिंटू पेंदाम, प्रकाश दुर्गे, कैलाश दुर्गे यांच्यासह आविसं व अजयभाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.