दक्षिण गडचिरोलीच्या मध्यवर्ती ठिकाणी झाली बस स्थानकाची सोय

विविध सुविधांसाठी देणार निधी- ना.आत्राम

गडचिरोली : जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महत्वाचे आणि मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आलापल्ली येथे शुक्रवारी नव्याने उभारलेल्या बस स्थानकाचे लोकार्पण अन्न व औषधी प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला आॅनलाईन हजेरी लावणार होते. मात्र काही तांत्रिक कारणामुळे ते सहभागी झाले नाही. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी वैभव वाघमारे, एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मीता सुतवणे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. याशिवाय एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने हेसुद्धा आॅनलाईन उपस्थित होते.

या बस स्थानकाचे उद्घाटन होत असले तरी बस स्थानकावर अनेक सुविधा अद्याप झालेल्या नाहीत. त्या निर्माण करण्यासाठी अतिरिक्त निधी दिला जाईल, असे आश्वासन यावेळी ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.