आठ वर्षाच्या चिमुकलीला बनविले वासनेची शिकार, नराधमाला अटक

न्यायालयाने दिला पाच दिवसांचा पीसीआर

गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या कोनसरी येथे एका आठ वर्षाच्या चिमुकलीला ३९ वर्षीय नराधमाने आपल्या वासनेची शिकार बनविले. परंतू या प्रकारानंतर आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याने तिने हा प्रकार कोणाला सांगितला नव्हता. दरम्यान तिला पोटात त्रास होऊ लागल्याने तब्बल महिनाभरानंतर या घटनेची वाच्यता झाली.

त्या पीडित मुलीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात आणल्यानंतर तिने झालेला प्रकार सांगितला. याप्रकरणी तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी गुरूवारी गुन्हा दाखल करून आरोपी ईबाकार दौलत मडावी याला अटक केली. त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.