सणासुदीच्या निमित्ताने कॅम्प एरियातील रामपुरीत वाटला आनंदाचा शिधा

खा.अशोक नेते यांच्या हस्ते किट देऊन शुभारंभ

गडचिरोली : शहराच्या कॅम्प एरियातील रामपुरी येथे पोळा आणि येणाऱ्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकविण्यासाठी ‘आनंदाचा शिधा’ वाटपाचा शुभारंभ खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आला.

उत्सवासाठी राज्य आणि केंद्र सरकार सामान्य नागरिकांच्या पाठीशी आहे, हा संदेश देत स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा दिला जात आहे. त्यात बाजारभावापेक्षा अत्यंत कमी दरात, म्हणजे फक्त १०० रुपयांमध्ये १ किलो रवा, १ पॉकेट तेल, १ किलो चनाडाळ, १ किलो साखर अशा पॅकेटची किट दिली जात आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी खासदार नेते यांनी केले.