आंधळीत आदिवासी विकास महामंडळाकडून हमीभावाने धान खरेदीला सुरूवात

आमदार कृष्णा गजबे यांनी केले उद्घाटन

कुरखेडा : तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत येत असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था आंधळी येथील धान खरेदी केंद्राचे रविवारी (दि.19) आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी शासनाच्या हमीभावानुसार शेतकऱ्यांकडील खरीप हंगामातील धानाची खरेदी केली जाणार आहे.

यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक मुरलीधर बावणे, भाजपचे तालुका अध्यक्ष चांगदेव फाये, कृउबा समितीचे उपसभापती व्यंकट नागिलवार, विनोद खुणे, केशव किरसान, हेमंत शेंद्रे, माणिक दरवडे, संस्थेचे संचालक मंडळ आणि बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.