खिशातच झाला मोबाईलचा स्फोट, कसारी येथील मुख्याध्यापकाचा मृत्यू

दुचाकीवरून जाताना झाला अपघात

देसाईगंज : तालुक्यातील कसारी येथील जि.प.प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक सुरेश संग्रामे हे दुचाकीने जात असताना त्यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. यामुळे अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. ही घटना कसारी ते सिरेगाव मार्गावर घडली.

प्राप्त माहितीनुसार, मुख्याध्यापक संग्रामे हे शाळा संपल्यानंतर दुचाकीने आपल्या मूळ गावी (सिरेगाव, जि.गोंदिया) येथे जात होते. यावेळी त्यांना एक फोन आला. त्यांनी फोन रिसिव्ह केला पण घाईघाईने तो कॅाल बंद न करता सुरूच होता. मोबाईलवर इंटरनेटही सुरूच होते. त्याच अवस्थेत ते दुचाकीने पुढे निघाले असताना एका खड्ड्यातून गाडी जात असताना शर्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. त्यामुळे संग्रामे यांच्या छातीजवळ मार लागला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. देसाईगंज पोलिसांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणले, पण डॅाक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.