बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशात पर्यंटकांनी घेतला मचाणावर बसून प्राणी निरीक्षणाचा आनंद

गुरवळा नेचर सफारीत दिसले विविध प्राणी

गडचिरोली : जवळच असलेल्या गुरवळा नेचर सफारी परिसरात गडचिरोली वनविभागातर्फे बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून पर्यटकांसाठी मचाणावर निसर्ग अनुभव आणि प्राणी निरीक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात जिल्हाधिकारी संजय दैने यांच्यासह एकूण 27 जणांनी मचाणावर बसून चंद्रप्रकाशात प्राणी निरीक्षणाचा आनंद घेतला.

गुरवळा नेचर सफारीमध्ये प्राणी निरीक्षणाचा कार्यक्रम मुख़्य वनसंरक्षक एस. रमेशकुमार, गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक धिरज ठेंबरे यांच्या मार्गदर्शनात, तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम यांच्या नेतृत्वात राबविण्यात आला. या उपक्रमात सहभागी पर्यटकांना रात्रीच्या प्रकाशात मचानवर बसून अस्वल, रानकुत्रे, रानडुक्कर, बिबट, चितळ, नीलगाय, चौसिंगा, कोल्हा, ससा आदी वन्यप्राण्यांचे दर्शन घेता आले.

जंगलात वावरणाऱ्या प्राण्यांना प्रत्यक्ष बघण्याचा, त्यांच्या हालचाली टिपण्याचा हा रोमांचक अनुभव, जंगलातील शांतता व पक्षांचा किलबिलाट पर्यंटकांना जवळून पाहता आणि अनुभवता आला. प्राणी निरीक्षणात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, बाबासाहेब जेजुरकर, शिवानी हट्टेवार, अनिल हट्टेवार, भूमिका मडावी, प्रभाकर चहारे, भूमिका चहारे, जिविका चहारे, ब्रिजेश नागदेवते, योगेश मोश्राम, स्वप्नील कोहाड, रुपेश वाळके, श्रीकांत पालेकर, लिना गेडाम, प्रमोद गेडाम, डॅा.हेमांगी पालेकर, तारा वाळके, डॅा.मुकेश अत्यालगडे, निखिल कोहपरे, अक्षय निमरड, मयुर बारापात्रे, विलास निमरड, श्रीकांत मल्लेलवार यांनी सहभागी होऊन मनसोक्त आनंद घेतला.

सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, गुरवळाचे क्षेत्र सहाय्यक विजय जनबंधू, गुरवळाचे वनरक्षक गुरु वाढई, येवलीचे वनरक्षक धर्मराव दुर्गमवार, विलास भोयर, संयुक्त वन व्यवस्थापन समिती हिरापूरचे अध्यक्ष रमेश मेश्राम, संयुक वन व्यवस्थापन समिती गुरवळाचे अध्यक्ष प्रदीप मेश्राम, तसेच गुरवळा नेचर सफारीचे गाईड अतुल नेंचलवार, लंकेश गेडाम, गिरीधर मेश्राम, गजानन तुंकलवार, आशिष बर्लावार, दीपक तुंकलवार, ज्ञानेश्वर सावसागडे, लोमेश निकुरे, मोतीराम गोटा यांनी सहकार्य केले.