आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन

३९ आश्रमशाळांतील खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर शनिवारी उत्साहात पार पडले. क्रीडाज्योत प्रज्वलित करून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार, अनिल सोमनकर, डॉ.प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर, सहाय्यक संशोधन अधिकारी गजानन बादलमवार, गडचिरोली पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर, प्राचार्य समशेरखान पठाण, श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखराचे अध्यक्ष दिलीप घोडाम, सचिव गिरीधर नेवारे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश गेडाम, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, मुख्याध्यापक विजय देवतळे, अजय बलगुजर, आदिवासी विकास निरीक्षक वासुदेव उसेंडी, रवी आत्राम, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर, गणेश पराते, प्रकाश अक्यमवार, पी.पी.कोरंडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमदरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील मुला-मुलींनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले. १९ वर्षीय मुलांचा व्हॉलीबॉलचा उद्घाटनीय सामना कोरची व अंगारा या बिट संघादरम्यान झाला. यात कोरची संघ विजयी ठरला. सहभागी खेळाडूंना शिक्षक नाजूक रुखमोडे यांनी तर पंचांना शिक्षक बळीराम जायभाये यांनी शपथ दिली.

प्रास्ताविक डॉ.प्रभू सादमवार यांनी केले. संचालन कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष कन्नाके तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांनी केले. प्रसिद्धी प्रमुख म्हणून शिक्षक सुधीर शेंडे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

कार्यक्रमासाठी पाचही बिटमधील क्रीडा निरीक्षक आशिष ढबाले, नागनाथ पवार, मोहन मारबते, जयप्रकाश गायकवाड, निलय गडे, पुरुषोत्तम बखर, सुभाष लांडे, रविकांत पिपरे, अशोक परतेकी, आनंद बहिरेवार आदींसह क्रीडा शिक्षक, विविध समितीचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

३९ आश्रमशाळांच्या ११०० विद्यार्थ्यांचा सहभाग

या संमेलनात करवाफा, भडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटमधील २४ शासकीय, तर १५ खासगी अनुदानित अशा एकूण ३९ आश्रमशाळेतील ११०० खेळाडूंचा सहभाग आहे. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात सांघिक व वैयक्तिक खेळांचे आयोजन केले आहे. या स्पर्धांमधून आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडागुण प्रदर्शित होणार आहेत.