– तर ग्रामीण भागातील युवक उत्कृष्ट खेळाडू बनतील : भाग्यश्री आत्राम

वडलापेठ येथे व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन

अहेरी : युवकांनी क्रीडा क्षेत्रात मागे न राहता कोणत्याही खेळामध्ये भाग घेऊन आपला नावलौकिक करावा. क्रीडा क्षेत्रात सातत्य राखून नियमित सराव केल्यास नक्कीच ग्रामीण भागातील युवक उत्कृष्ट खेळाडू बनतील, असा विश्वास माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केला.

अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथील भगवंतराव महाराज स्टेडियममध्ये राणी दुर्गावती व्हॉलीबॉल क्लबतर्फे आयोजित व्हॉलीबॉल स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र कदम, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी पं.स. सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम, सरपंच सैलू मडावी, नागेश करमे, वडलापेठचे पोलिस पाटील निरंजन दुर्गे, जामगावचे पोलिस पाटील अरविंद निखाडे, चुटुगुंटाचे उपसरपंच सुरेश आत्राम, खमणचार ग्रा.पं. सदस्य संतोष आत्राम, अॅड पंकज दहागावकर, ग्रा.पं. सदस्य शेवंता कोडापे, महेश बाकीवार, माजी सरपंच मंजुळा आत्राम, सखाराम सुंके, भीमा आत्राम, तसेच चिंतलपेठ, वडलापेठ आणि जामगाव परिसरातील व्हॉलीबॉलप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी भाग्यश्री आत्राम म्हणाल्या, वडलापेठ हे आमच्या पूर्वजांचे गाव आहे. या गावात आमच्या अनेक आठवणी आहेत. येथील युवकांनी व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे सांगताच माझ्याकडून प्रथम पारितोषिक घोषित केले. गावातील युवकांनी विविध क्षेत्रात उंच भरारी घ्यावी अशी आमची इच्छा आहे. युवकांच्या उज्वल भविष्यासाठी सदैव प्रयत्नरत असल्याचे त्यांनी म्हटले.

या कार्यक्रमासाठी गावात प्रवेश होताच वडलापेठ, चिंतलपेठ आणि जामगाव येथील लोकांनी ढोलताश्यांच्या गजरात ताईंचे स्वागत केले. व्हॅालीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनपर सामन्यात स्वतः भाग्यश्री आत्राम यांनीही चेंडू टोलवून मैदान गाजविले. त्यांना मैदानात परिसरातील महिलांनीही साथ दिली.