गडचिरोलीत सोमवारी जमणार जिल्हाभरातील सरपंच, सचिवांसह तालुकास्तरीय अधिकारी

जि.प.कडून एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा

गडचिरोली : जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागांची आणि उपक्रमांची माहिती अंमलबजावणी यंत्रणांना अवगत करण्यासाठी सोमवार, दि.26 रोजी जिल्ह्यातील सरपंच, सचिव आणि तालुका व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही एक दिवसीय कार्यशाळा आरमोरी मार्गावरील सुमानंद सभागृहात होणार आहे.

या कार्यशाळेत सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), सरपंच, सचिव, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागांतर्गत सर्व अभियंते, गटसंसाधन केंद्राअंतर्गत गट, समुह समन्वयक, अभियंते, कर्मचारी यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश जि.प.सीईओ आयुषी सिंह यांनी दिले आहेत.

कार्यशाळेत विभाग प्रमुख त्यांच्या विभागांतर्गत विविध योजना, उपक्रम याबाबत मार्गदर्शन आणि सादरीकरण करणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत चालणाऱ्या कार्यशाळेत विविध विभागांचे सादरीकरण आणि मार्गदर्शन केले जाणार असल्याचे जि.प.प्रशासनाकडून सांगण्यात आले.