लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार कोण? जाणून घेतली पदाधिकाऱ्यांची मते

ना.विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक

गडचिरोली : आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून आणण्याकरिता गडचिरोली जिल्हा काँग्रेसची नियोजन बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीला राज्याचे विरोधीपक्ष नेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ना.वडेट्टीवार यांनी लोकसभा निवडणूक उमेदवार निवडीच्या संदर्भाने बुथ पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली व लवकरच उमेदवार घोषित करणार असल्याचे सांगितले.

यावेळी ना.वडेट्टीवार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना, मेरा बुथ सबसे मजबूत अभियान राबवून बुथ मजबुतीकरिता व निवडणुकीच्या पूर्वतयारीकरिता आवश्यक त्या सूचना केल्या.

यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव डॉ.नामदेव किरसान, माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी आ.पेंटारामा तलांडी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, काँग्रेसचे जेष्ठ नेते बंडोपंत मल्लेलवार, माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडलावार, माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पा.पोरेटी, काँग्रेस नेते हसन गिलानी, प्रदेश सचिव डॉ.चंदा कोडवते, सगुणा तलांडी, लता पेदापल्ली, माजी नगराध्यक्ष राजेश कात्रटवार, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अतुल मल्लेलवार, आदिवासी सेलचे अध्यक्ष हनुमंतू मडावी, किसान सेलचे अध्यक्ष वामनराव सावसाकडे, जि.प.माजी उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, आरमोरीचे मिलिंद खोब्रागडे, कोरचीचे मनोज अग्रवाल, वडसाचे राजेंद्र बुल्ले, गडचिरोलीचे वसंत राऊत, चामोर्शीचे प्रमोद भगत, अहेरीचे डॉ.पप्पू हकीम, एटापल्लीचे रमेश गंपावार, मुलचेराचे प्रमोद गोटेवार, धानोराचे प्रशांत कोराम यांच्यासह विविध सेलचे अध्यक्ष प्रामुख्याने उपस्थित होते.