जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत राजनगट्टाच्या अनुप कोहळेचे यश, विभागीय स्पर्धेत जाणार

५ डिसेंबरला नागपूर येथे होणार स्पर्धा

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवातील कथालेखन स्पर्धेत राजनगट्टा (ता.चामोर्शी) येथील अनुप वसंत कोहळे हा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. यामुळे तो विभागस्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.

विभागीय स्पर्धेतून राज्याचा संघ तयार होऊन तो राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याचे प्रतिनिधीत्व करेल. जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल अनुप कोहळे याचा जिल्हा क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांच्या हस्ते 2 हजार रुपयांचा धनादेश आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विभागीय स्तरावरील स्पर्धा 5 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे पार पडणार आहे