धानाच्या चुकाऱ्यांसह विविध मागण्यांसाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन

पालकमंत्र्यांना केले 'टार्गेट'

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकरी, महिला, युवक व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध समस्यांना घेऊन बुधवारी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. इंदिरा गांधी चौकात झालेल्या या धरणे आंदोलनात पालकमंत्री तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत त्यांनी महिन्यातून किमान दोन दिवस गडचिरोली जिल्ह्यासाठी द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांना धानाचे प्रलंबित चुकारे द्यावे, सोलर कृषी पंप घेणे आवश्यक न करता विद्युत कृषी पंपाचा पर्याय द्यावा, शेतीच्या वीज पुरवठा वाढवून आणि लोडशेडींगचे योग्य नियोजन करावे, वनपट्ट्यांचे प्रलंबित दावे निकाली काढावे, प्रस्तावित विमानतळाकरीता सुपीक जमीन अधिग्रहित न करता इतर शासकीय किंवा वनजमिनीचा वापर करण्यात यावा, विविध योजनांचे थकित अनुदान द्यावे, जड वाहतुकीमुळे होणारे अपघात व प्रदुषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाय करण्यात यावे, जिल्ह्यात सुरु होणाऱ्या प्रकल्पांत स्थानिक तरुणांकरीता 50 टक्क्यांपेक्षा अधिक जागा आरक्षित करून त्यांना प्राधान्य देण्यात यावे, मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिन्यातून किमान 2 दिवस जिल्ह्यासाठी देऊन जनतेच्या समस्या ऐकून घ्याव्या, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनात माजी जि.प.उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रदेश काँग्रेसचे सचिव पंकज गुड्डेवार, रवींद्र दरेकर, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, राजेंद्र बुल्ले, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अनिल कोठारे, नेताजी गावतुरे, प्रभाकर वासेकर, राजेश ठाकूर, भूपेश कोलते, दत्तात्रय खरवडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, घनश्याम वाढई, काशीनाथ भडके, सुनील चडगुलवार, माजी नगरसेवक रमेश चौधरी, नंदू वाईलकर, हरबाजी मोरे, शेतकरी नेते श्याम मस्के, माधव गावळ, राजाराम ठाकरे, उत्तम ठाकरे, पिंकू बावणे, ढिवरू मेश्राम, दिवाकर निसार, देवेंद्र ब्राम्हणवाडे, शालिनी पेंदाम, कविता उराडे, गौरव येनप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, कुणाल ताजने, प्रफुल आंबोरकर, उत्तम ठाकरे, जितेंद्र मुनघाटे, प्रतीक बारसिंगे, जितेंद्र मुप्पीडवार, मनोज उंदीरवाडे, हेमंत मोहितकर, जावेद खान, स्वप्नील बेहरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते.