दिवाळीनिमित्त अम्ब्रिशराव आत्राम यांची अहेरी-आलापल्लीतील प्रतिष्ठानांना भेट

व्यापाऱ्यांना मिठाई, तर मुलांना फटाक्यांचे वाटप

अहेरी : दिवाळी हा व्यापाऱ्यांसाठी सर्वात मोठा आणि महत्वाचा सण असतो. माता लक्ष्मी, गणेश तथा कुबेराचे पूजन करून व्यापारी नवीन व्यापारी वर्षांची सुरुवात करतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेक व्यापाऱ्यांनी माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांना आग्रहाचे निमंत्रण दिले होते. त्यांचा मान राखत अम्ब्रिशराव यांनी अहेरी तथा आलापल्ली येथील विविध प्रतिष्ठानांना भेट देत माता लक्ष्मी, गणेश तथा कुबेराचे पूजन केले.

यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांशी आस्थेने संवाद साधला. ज्येष्ठ व्यापाऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत कुटुंबियांबद्दलही जाणून घेतले. यावेळी त्यांनी प्रत्येक व्यापाऱ्याना मिठाई तथा लहान मुलांना फटाके देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी त्यांच्यासोबत युवा नेते अवधेशराव बाबा, प्रवीणराव बाबा, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास तोडसाम, पेसा अध्यक्ष दीपक तोगरवार, अभिजित शेंडे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.