प्लॅटिनमच्या रमनने घातली सुवर्णाला गवसणी, बॅाक्सिंगमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

१७ वर्षाखालील गटात अनंती देशमुखला कास्य

गडचिरोली : येथील प्लॅटिनम ज्युबिली स्कूल आणि ज्युनिअर कॅालेजमधील बारावीचा विद्यार्थी रमन रोशन मसराम याने १९ वर्षाखालील ५६ किलो वजनगटात साऊथ झोन बॅाक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली.

भंडारा जिल्ह्यातील लाखणी येथे नुकत्याच झालेल्या सीबीएसई साऊथ झोन बॅाक्सिंग स्पर्धेत त्याने ही कामगिरी केली. याशिवाय १७ वर्षाखालील ८५ किलो वजनगटात प्लॅटिनमच्याच अनंती मनोज देशमुख हिने कास्यपदक पटकावले. तसेच ओम प्रमोद पुण्यपवार, कावेरी अनिल प्यारमवार यांनीही बॅाक्सिंगमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन केले.

हे सर्व विद्यार्थी बॅाक्सिंग प्रशिक्षक यशवंत दिवाकर कुरूडकर यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करतात. संस्थेचे सचिव अझिज नाथानी यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक कुरूडकर, मुख्याध्यापिका अनैता चार्ल्स, शिक्षकवृंद आणि आई-वडिलांना दिले.