गडचिरोली : भाजपच्या अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांनी मंगळवारी तेलंगणातील निर्मल येथे बुथ प्रमुख, शक्ती प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शन केले. येत्या ३० नोव्हेंबरला तेलंगणातील निर्मल जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
खासदार नेते यांच्याकडे निर्मल, मुधोल आणि खानापूर या तीन विधानसभा मतदार संघांचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. या तीनही मतदार संघात भाजपचे उमेदवार विजयी व्हावेत यासाठी पूर्ण निष्ठापूर्वक दिलेली जबाबदारी पार पाडा, असे आवाहन करत खा.नेते यांनी कार्यकर्त्यांना चार्ज केले. यावेळी निर्मल जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते.