भाजपने राबविले सेवा सुशासनानिमित्त गडचिरोलीत विविध कार्यक्रम

खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात माणुसकीचा घास

गडचिरोली : भारतीय जनता पक्ष जिल्हा गडचिरोलीच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सुशासन दिन पाळण्यात आला. या कार्यक्रमाअंतर्गत महिला व बाल रुग्णालयात फळे वाटपासह “माणुसकीचा घास” भरविण्यात आला. यात खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या नेतृत्वात अन्नादान करण्यात आले.

यावेळी जेष्ठ नेते बाबुराव कोहळे, जिल्हा संघटन महामंत्री तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जेष्ठ नेते रमेश भुरसे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी, जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, चंद्रपूर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, रुग्णालयाच्या अधिक्षिका डॉ.माधुरी किलनाके, डॉ.प्रशांत पेंदाम, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणकर, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री विनोद देओजवार, शहर महामंत्री केशव निंबोड, माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, जेष्ठ नेत्या प्रतिभा चौधरी, महिला आघाडी मोर्चाच्या जिल्हा महामंत्री वर्षा शेडमाके, शहराध्यक्ष कविता उरकुडे, वैष्णवी नैताम, माजी पं.स. सभापती मारोतराव ईचोडकर, माजी उपसभापती विलास देशमुखे, नगरसेवक आशिष पिपरे, सभापती भारत बावणथडे, माजी नगराध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, उल्हास देशमुख, अनिल तिडके, हर्षल गेडाम, दीपक सातपुते, आशिष कोडापे, विवेक बैस, संजय राजू शेरकी, विजय शेडमाके, दतू माकोडे, राकेश राचमलवार, सोमेश्वर धकाते, रमेश अधिकारी तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.