डॉ.गावित आणि खा.‌नेते यांनी हाती कुंचला घेऊन कुरखेडातील भिंतींवर रेखाटले कमळ

अभियानातून भाजपची वातावरण निर्मिती

भिंतीवर कमळाचे चित्र रेखाटताना खा.अशोक नेते, सोबत ना.विजयकुमार गावित

कुरखेडा : येणाऱ्या निवडणुकांकरिता वातावरण निर्मितीसाठी भाजपकडून भिंती लेखन अभियान सुरू आहे. कुरखेडा येथे यात आदिवासी विकासमंत्री डॉ.विजयकुमार गावित आणि खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक ‌नेते यांनीही यात सहभाग घेतला.

भारतीय जनता पक्ष कुरखेडा तालुक्याच्या वतीने भाजपचे जिल्हा सचिव गणपत सोनकुसरे यांच्या पुढाकाराने ‘फिर एक बार, मोदी सरकार’ असे वाक्य आणि कमळचित्र रेखाटण्यात आले.

यावेळी आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, लोकसभा विस्तारक बाबुराव कोहळे, तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री रविंद्र गोटेफोडे, अनु.जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ॲड.उमेश वालदे, तालुका महामंत्री मनोहर आत्राम, नगरसेवक तथा भाजपा युवा नेते सागर निरंकारी, स्वप्निल खोब्रागडे, जयश्री मडावी, जागृती झोडे तसेच मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.