राजाराम येथे समक्का-सारक्का जत्रेचा उत्साह, भाग्यश्री आत्राम यांचाही सहभाग

भाविकांकडून पूजाअर्चा, आज समारोप

अहेरी : तालुक्यातील राजाराम खांदला येथील समक्का-सारक्का जत्रा २१ फेब्रुवारीपासून सुरू आहे. यात दि.२२ ला माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी पुजाअर्चा करून आशीर्वाद घेतले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजाराम (खां) येथे समक्का-सारक्का जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. २१ फेब्रुवारी पासून याठिकाणी विधिवत पूजा सुरू असून २३ फेब्रुवारीपर्यंत ही जत्रा सुरू राहणार आहे. समक्का-सारक्का मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी मंदिरात भेट देऊन पूजाअर्चा करत मातेचे आशीर्वाद घेतले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, सरपंच मंगला आत्राम, उपसरपंच रोशन कंबगोनिवार, सदस्य विनायक आलाम, सपना मारकवार, तिरुपती मोतकुरवार, संतोष आत्राम, शंकर कोडापे, मुख्याध्यापक एम.व्ही. बासनवार आदी उपस्थित होते.