गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली जिल्ह्यातील सक्रिय सदस्यता नोंदणीची महत्वपूर्ण बैठक दि.28 फेब्रुवारीला गडचिरोलीतील विश्राम भवनात पार पडली. या बैठकीत भाजपचे नागपूर विभाग कार्यालय प्रमुख संजय फांजे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, आ.डॉ.मिलिंद नरोटे, माजी आ.डॉ.देवराव होळी, लोकसभा समन्वयक प्रमोद पिपरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र ओल्लालवार, जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री योगिता पिपरे, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष आशिष पिपरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष गीता हिंगे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पोहणकर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अनिल तिडके उपस्थित होते.
या बैठकीत संजय फांजे यांनी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील भाजप सदस्य नोंदणी व सक्रिय सदस्य याबाबतचा आढावा घेतला. तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. बैठकीला जिल्हा पदाधिकारी, सर्व आघाडीचे पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, महामंत्री, शहर अध्यक्ष, महामंत्री उपस्थित होते.